![]() |
शांती अवेदना : ग्रंथाली :
पहिली आवृत्ती :26 जानेवारी 2010
|
कधी नुसताच भगभगीत उजेड
कधी काळखभिन्न सन्नाटा
कधी काळखभिन्न सन्नाटा
माणूस जिवंत असल्याची जाणवत नाही कोणती खूण, अशी आर्त, व्याकुळ तगमग कवितेत सर्वत्र भरून राहिली आहे.
पुष्पाग्रज यांच्या कवितेचा विशिष्ट असा एक ‘मूड’ आहे. त्यांची कविता तपशील, माहिती, भूमिकेचा अभिनिवेश, विशिष्ट इडियमचा टोकाचा आग्रह यांपासून चांगल्या अर्थाने मुक्त आहे. प्रचलित प्रतीके, प्रतिमा, मिथके ह्यांच्या आवरणाला भेदून सत्याचा लसलसता कोंब पकडू पाहणारी पुष्पाग्रजांची कविता वेदनेसोबत निरंतर प्रवास करणार्या अवघ्या समष्टीला शांती-अवेदनेची अर्थवत्ता प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करणारी अस्तित्वलक्ष्यी कविता आहे.
-प्रज्ञा दया पवार
(शांती अवेदना (ग्रंथाली प्रकाशन) काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावरील मजकूर)
No comments:
Post a Comment